भीती वाटते जगाची मला
आई मला तू तुझ्या कुशीत घे.
होय वय वाढले आहे माझे आता
कुशीत घ्यायला मान्य आहे मला.
पण तुझे हे लेकरू तुझ्या डोळ्यांतून
जगाशी लढण्याची शक्ती मागते.
मान्य आहे मला की मी चुकीची
पुन्हापुन्हा वागते.
माफी नाही जी परमेश्वराच्या दारी
ती मला तुझ्याच कुशीत मिळते.
पुन्हापुन्हा रडूंदे मला कुशीत तुझ्या
भिजवेन मी पुन्हापुन्हा रेशमी पदर तुझा.
तुझा पदर माझ्या गुन्ह्यांना शोषून घेतो.
अश्रू रक्त काहीही असो कुशी तुझी ती घेते झिरपून!
मीही मग झोपून जाते भान माझे हरपून.
कुशी तुझी हळूहळू होते का ग अशी मलूल आई?
आता तू माझ्या कुशीत ये….
या देहाला आणि मनाला तूच केले आहे बळकट देऊन तुझी कुशी
आता ये माझ्या कुशीत आई घाबरू नकोस!