हक्क!! 🥰

हक्क
मनात नेहमी वाटतं कोणीतरी हक्काचं असावं..
राग आला तर खुलून रुसाव..
हातात हात नाही तरी प्रेमानं डोळ्यात बसावं..
उगाचच बसल्याजागी कोणीतरी आपल्यासाठी आहे म्हणून खुलून हसावं..
खरंच कोणीतरी हक्काचं असावं..
हक्क नाही करता येत कोणावर म्हणतात सगळे..
पण राहीचे नसते कोणालाच वेगळे..
माणसांच्या गर्दीत हक्क जातो आपण कमवायला ..
स्वतःच लागतो मग स्वतःच्या मनाला गमवयला…
हक्क नको गाजाऊस जेव्हा बोलते प्रिय व्यक्ती ..
गळून जाते तेव्हा मनातली शक्ती..
खरंच कंठ फोडून रडाव..
पण कोणीतरी आता हक्काचं पडावं..

Leave a Comment